भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक बुथ प्रमुखाने आपल्या  घरावर भाजपचा फलक लावला पाहिजे. त्यातून आपण मोदींच्या नेतृत्वात काम करत आहोत, अशी भावना लोकांची निर्माण होईल, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत भरत नगर परिसरात पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मराठी नववर्षाचे स्वागत, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याप्रसंगी  बोलत होते. पश्चिम नागपूरमध्ये भाजपने प्रत्येक बूथ प्रमुखाच्या घरावर  पक्षाचा फलक  लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे, तो स्तुत्य असून शहरातील अन्य विधानसभआ मतदार संघात हा उपक्रम राबविला पाहिजे. यामुळे भाजपमध्ये खालपासून वरपर्यंत विविध पदांवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आपण  मोदींच्या नेतृत्वात काम करत आहोत, अशी भावना निर्माण होईल त्याचा अभिमान असेल असेही फडणवीस म्हणाले.  या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून पश्चिम नागपूर मतदार संघामध्ये भाजप आणखी भक्कम होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी  व्यक्त केली.