नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच जुगलबंदी बघायला मिळाली. दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारने मंत्रीमंडळात महिलांना प्राधान्य द्याव, अशी सुचना केली. त्याला देवेंद्र फडणसांनी प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा – “अजितदादा, आम्ही मुख्यमंत्री बोलत असतानाही बाकडे वाजवले तुम्ही मात्र सिलेक्टिव….” देवेंद्र फडणवीस यांचं रोखठोक उत्तर

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

अजित पवार काय म्हणाले होते?

“राज्य पुढे नेत असताना माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी मंत्रीमंडळात महिलांना प्राधान्याने स्थान द्यावं, अशी सुचना अजित पवार यांनी केली होती. तसेच त्यामुळे इतर आमदार सोडून जातील, अशी भीती तुम्हाला असेल तर तसं मुळीच होणार नाही”, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता.

अजित पवारांना फडणविसांचे प्रत्युत्तर?

अजित पवारांच्या या सुचनेवर देंवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. “अजित पवारांनी महिला आमदारांना मंत्री बनवण्यासंदर्भात ज्या सुचना केल्या आहेत. त्या आम्ही अत्यंत गंभीरपणे घेऊ. तसेच येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आधी महिला आमदारांना स्थान द्येऊ. त्यामुळे मंत्रीपदासाठी कोणीही कोट शिवून बसलं असलं, तरी महिलांना आधी प्राधान्य दिलं जाईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “हे महाराज उपमुख्यमंत्री असूनही रेटून बोलतात आणि तुम्ही…”, अजित पवारांची विधानसभेत टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांना दिला मिश्किल सल्ला!

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना, भाजपाचे लोकं टाळ्या वाजवत नाही, असं अजित पवार म्हणाले होते. त्याला देवेंद्र फडणविसांनी प्रत्युत्तर दिलं. “तुमच्या काळात तीन पक्ष सत्तेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री उत्तर देणार असेल, तर सभागृहात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बसत होते. बाकी दोन पक्षाचे आमदार बाहेर असायचे. एवढच नाही, तर मागण्या मान्य करून घेण्यासाठी संबंधित पक्षाच्या आमदारांना सभागृहात आणायची जबाबदारी त्या-त्या मंत्र्यांवर असायची. मात्र, आमच्याकडे असं नाही आहे. सभागृहात भाजपा आणि शिवसेनेचे सर्व आमदार बसले आहेत. खरं तर आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या. मात्र, तुम्ही सोयीच्या टाळा ऐकायला लागले आहात”, असं ते म्हणाले.