नागपूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे,अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असतानाच याच कार्यक्रमात फडणवीस यांनी ‘जिसके साथ तेली वो बडा भाग्यशाली ’ असे विधान केल्याने याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. अव्यक् माझ्यासोबत नेहमीच काय असतात याचे कारण म्हणजे ‘जिसके साथ तेली वो बडा भाग्यशाली ’असे सांगत तेली समाज आमच्या पाठिशी राहिला तर आमचे भाग्य वर वर जाणार असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज असलेल्या तेली समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला.

रविवारी संत जगनाडे चौकात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरण सोहोळ आणि आर्ट गॅलरी भूमिपूजन सोहोळा कार्यक्रम पार पडला. हा तेली समाजाचाही मेळावा होता. यावेळी भाषण करताना बावनकुळे यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीस यांनीही तेली समाजाचा मेळावा असल्याने पाहून ‘जिसके साथ तेली वो बडा भाग्यशाली ’असे सांगत चंद्रशेखर बावनकुले आमच्या सोबत आहे.

हेही वाचा: ..तर आम्ही सभागृहात येणार नाही; विधान परिषदेत चंद्रकांत पाटील संतप्त

त्यामुळे,तेली समाज आमच्या पाठिशी राहिला तर आमचे भाग्य फळफळेल , अशी भविष्यवाणीही वर्तवली. . महाराष्ट्रात मुंबईच्या इमारती हे आमचे वैभव नाही तर वारकरी संप्रदायानी दिलेले विचार हे आमचे वैभव आहे. ते टिकवायचे असेल तर संताचे वास्तव्य जिथे आहे त्या जागा पुढील पिढीसाठी जतन कराव्या लागणार आणि त्यांच्यापर्यंत संताचे विचार पोहचवावेव लागणार आहे असेही फडणवीस म्हणाले. कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, जयदत्त क्षीरसागर, मोहन मते, प्रवीण दटके आदी उपस्थित होते.