चंद्रशेखर बोबडे

नागपूर : स्थावर मालमत्तांचे फेरफार करताना पारदर्शकता यावी म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया ऑनलाइन केली असली तरी त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

एक एप्रिल २०२१ पासून राज्यभरात स्थावर मालमत्तांचा ऑनलाइन फे रफार करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. ते करताना अनेक अचडणींना कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक विभागासाठी एकच सव्‍‌र्हर आहे. त्यात वाढ होणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये ‘लिंक फेरफार’ची तरतूद नाही. एखाद्या संपत्तीची एका व्यक्तीकडून प्रथमच विक्री होत असेल तर त्याचा फे रफार होतो. पण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीने व त्याने तिसऱ्या व्यक्तीला संपत्ती विक्री के ली असेल तर अशा साखळी प्रकरणात पूर्वीच्या प्रत्येक मालकांचा शोध घ्यावा लागतो. ती संपत्ती संबंधितांच्या नावावर झाली होती का हेसुद्धा तपासावे लागते. मात्र संगणकात तशी तरतूदच नसल्याने अशी प्रकरणे प्रलंबित राहतात.

वारसा हक्कातील संपत्तीच्या फेरफार प्रकरणात अनेक पोटहिस्सेदार असतात. संगणक प्रणालीनुसार ही प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होत असली तरी अनेकदा ती अडचणीची ठरते.

क्षेत्रविभाजनही परस्पर करणे योग्य ठरत नाही. याशिवाय संपत्तीचे नामांतरण पूर्ण झाल्यावर आखिव पत्रिका कर्मचाऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा दिसत नाही, अनेकदा कामासाठी पत्रिकेची पुन्हा गरज भासते. यासंदर्भात विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेची नागपुरात बैठक झाली. त्यात ऑनलाइन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन फेरफार करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक अर्ज प्रलंबित राहतात, त्यामुळे अशा अर्जाची संख्याही सातत्याने वाढत आहे. या कामाला गती मिळावी म्हणून प्रक्रियेतील तांत्रिक दोष दूर करावे व तोपर्यंत ऑफलाइन पद्धतीने फेरफार करावे, अशी मागणी जमाबंदी आयुक्तांकडे केली आहे.

– दिलीप गर्जे, अध्यक्ष विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटना