अकोला : मध्य रेल्वेच्या झांसी जंक्शन रेल्वेस्थानकाच्या दुरुस्ती कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या सहा एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अकोला स्थानकावरून धावणारी गोंडवाना एक्सप्रेसचा त्यात समावेश आहे. गोंडवानाच्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यानच्या दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे.

हेही वाचा – गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रुग्णावरच औषध खरेदीचा भार, जननी सुरक्षेचा निधी मुरतो कुठे?

हेही वाचा – सनातन धर्मावर टीका : उद्धव, राहुल गप्प का? अनुराग ठाकूर यांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर शुक्रवार आणि रविवारी प्रवास सुरू होणारी १२४०६ हजरत निजामुद्दीन भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस १५, १०, २२, २४ व २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आलेली आहे. तसेच दर मंगळवार व रविवार प्रवास सुरू होणारी १२४०५ भुसावळ जं.- हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेसची १७, १९, २४, २६ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. पायाभूत सुविधेच्या कामासाठी गोंडवाना गाडीच्या अप व डाऊन मार्गावरील दहा फेऱ्या धावणार नाहीत. परिणामी, प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.