नागपूर : तमिळनाडूचे मंत्री स्टॅलिन सनातन धर्मावर टीका करीत असतना काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजूनपर्यंत त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. विरोधकांनी या मुद्यावर मौन सोडले पाहिजे, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – आकडे टाकून वीज चोरीचे प्रमाण वाढले; अकोला परिमंडळात ३६४ आकडेबहाद्दरांवर कारवाई

हेही वाचा – गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रुग्णावरच औषध खरेदीचा भार, जननी सुरक्षेचा निधी मुरतो कुठे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे स्वत:ला हिदुत्ववादी समजतात त्यांचे या विषयावर मौन का ? काही लोकांना भीती आणि गोंधळ पसरवण्याची, खोटे बोलण्याची सवय असते. सत्तालालसेपोटी उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या विचारसरणीलाही विसरले आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काय विचार केला असता, असे ठाकूर म्हणाले.