वाशिम : पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याची परंपरा यावर्षी मोडीत निघणार आहे. पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यात झेंडावंदन करणार असल्याने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील झेंडावंदन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, वाशिम जिल्हा राठोड यांची सासरवाडी आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे नेहमीप्रमाणे गृहजिल्हा यवतमाळात झेंडावंदन करणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांचे जिल्ह्याकडे वारंवार होणारे दुर्लक्ष जनतेमधे चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्याकडे यवतमाळ व वाशिम या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली. मात्र, त्यांनी कायम वाशिम जिल्ह्याकडे दुर्लक्षच केले, असा आरोप जनतेतून होत आहे.

हेही वाचा – धावत्या रेल्वेगाडीतील पाणी संपल्याचे आता लगेच कळणार, मध्य रेल्वेतील अभियंत्याचे संशोधन

हेही वाचा – सोयाबीनवर ‘पिवळा मोझक’ रोगाचे आक्रमण; ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्याच्या शासकीय योजनेचा आढावा, नियोजन बैठका, समित्यांची निर्मिती यासह अनेक विषयांचा आढावा यवतमाळ येथूनच घेतला आहे. स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन पालकमंत्री करतात. मात्र यावेळेस झेंडावंदन करण्याचा मान मंत्र्यांना देण्यात आल्याने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आगामी काळात पालकमंत्री बदलणार का? यावरून राजकीय गोटात चर्चा रंगत असून जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री देण्याची मागणी जोर धरत आहे.