नागपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अधिक होती. प्रथमच मुंबई बाहेर प्रदेश काँग्रेस कार्यकारिची बैठक आयोजित करण्यात आली. नागपुरात मंगळवारी ही बैठक येथील राणीकोठी येथे झाली.

या बैठकीला हाथ से हाथ जोडो अभियानचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर पदाधिकारी होते. परंतु माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधिमंड‌ळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर बैठकीला आले नव्हते.

हेही वाचा >>> नागपूर : प्रदेश कार्यकारिणीला गैरहजर राहणाऱ्यांना काँग्रेस बजावणार नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्वांमध्ये चर्चा मात्र अशोक चव्हाण यांच्या गैरहजरीची होती. त्यासंदर्भात पटोले यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रकृती ठीक नसल्याने अशोक चव्हाण पाच-साडेपाच तासांचा प्रवास करू शकत नव्हते. त्यांनी पक्षाला तसे कळवले आहे. यशोमती ठाकूर यांची सासू आजारी असल्याने त्या नाशिकला आहेत. बाळासाहेब थोरात हे प्रकृती बरी नसल्याने बैठकीला उपस्थित राहून शकले नाही.