बुलढाणा: साता समुद्रापार परदेशात असलेल्या लाडक्या मुलगा, सुनबाई, मुलगी,जावाईबापू, नातवंडे किंबहुना अन्य नातलगांना आपल्या हाताने बनविलेला फराळ पाठवायचा आहे का? मग यात काहीच अडचण नाहीये कारण डाक विभाग आता तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे. भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली. मात्र दिव्याचा हा झगमगाट खमंग फराळ शिवाय अपूर्ण आहे.

मात्र आपला घरगुती फराळ परदेशातील प्रियजनांना कसा पाठवायचा हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर म्हणजे डाकघर! डाकघरामार्फत परदेशात अगदी माफक घरात दिवाळी फराळ पाठविता येणार आहे. बुलढाणा डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा… दिवाळीत ‘एसटी’ने प्रवास करायचाय? पुण्याला जाण्यासाठी इतके जास्त शुल्क मोजावे लागणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी तयार केलेला फराळ युएसए , कॅनडा, युएई, युके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया, आर्यलँड या देशातील प्रियजनांना वाजवी दरात पाठवता येणार आहे.यासाठी फक्त नजीकच्या डाक विभागाशी संपर्क करावा लागणार आहे.