नागपूर : ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी वैदिकांचा सनातनी ब्राह्मण व्यवस्थेचा शिरच्छेद करावा, अशी भूमिका घेतली, त्यांच्याच शिक्षण संस्थेतील २०० शिक्षक सुटी टाकून अयोध्येला बाबरी मशीद पाडायला गेले होते, असा दावा चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी केला आहे.

मराठा सेवा संघातर्फे ‘मा. म. देशमुख एक आकलन’ या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी बळीराजा संशोधन केंद्र, मराठा सेवासंघ परिसर, सुर्वेनगर येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे होते. प्रमुख अतिथी म्हणून मंजुश्री मा.म. देशमुख, डॉ. प्रा. अशोक राणा, डॉ. पी.एस. चंगोले, डॉ. बबन नाखले, विवेक कडू यांची होते.

‘मी रयत शिक्षण संस्थेचं बघितलं ज्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा वैदिकांचा, सनातनी ब्राह्मण व्यवस्थेचा शिरच्छेद करावा अशा पद्धतीचे विचार मांडले त्या पद्धतीने कृती केली, त्या शिक्षण संस्थेतील २०० शिक्षक १९९२ साली बाबरी मशीद पडली, तेव्हा सुटी टाकून अयोध्याला आले होते. त्यामुळे लाभार्थी गद्दारी करतात आणि मग आपला विचार मागे राहतो. मा.म. देशमुख यांनी अशा विचारांनी वागणाऱ्यांवर रट्टे मारले, प्रचंड फटके मारले आहत हे आपण लक्षात घेतले पाहिजे,’ असे ज्ञानेश महाराव म्हणाले.

बहुजन समाजाला धार्मिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरीच्या जोखडातून बडातून मुक्त मुक्त क करून स्वयंप्रकाशित – करण्याचे ‘मा. म. देशमुख यांचे स्वप्न – पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व विचारवंतांनी एकत्र यावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे सरचिटणीस मधुकर मेहेकरे यांनी केले.

मा. म. देशमुख यांच्या जयंतीदिनी मराठा सेवा संघातर्फे व्याख्यानमाला आयोजित करण्यात येईल. त्यासाठी समाजातील इच्छुकांनी पुढाकार घ्यावी, असे आवाहन मेहेकरे यांनी केले. तसेच त्यांनी मा. म. देशमुखांची डायरी, नोंदवह्या या सर्वांवर आधारित ग्रंथ देखील काढण्याचे सुतोवाच केले. डॉ. चंगोले यांनी मा.म. देशमुख यांचा सहवास आणि त्यांच्या ग्रंथाचा संदर्भ देत अनेक आठवणींना उजाळा दिला.

मा.म. देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र खिशात ठेवत होते. यातून त्यांना प्रेरणा मिळत होती. परंतु ते आंबेडकरांचीप्रतिमा बागळतात हे समाजातील लोकांना कळू देऊ इच्छित नव्हते. कारण, तेव्हा समाज आज सारखा प्रगल्भ नव्हता. भारतीय पुरुषात महिलांना दुय्यम स्थान देण्याची गुमर्मी मनुस्मृतीतून आली, असे मा. म. देशमुख यांनी आपल्या संशोधनाअंती ठासून सांगितले होते, याकडेही डॉ. चंगोले यांनी लक्ष वेधले, डॉ. प्रा. अशोक राणा म्हणाले, मा.म. देशमुख निर्भिड होते. ते कधी घाबरले नाहीत आणि कधी माघारही घेतली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात’

ज्ञानेश महाराव यांनी मा.म. देशमुख यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण सांगितली. देशमुख है रोज व्यायाम करायचे आणि डोक्यात आलेले विचार लगेच लिहून काढायचे. समाजाला पुढे नेण्यासाठी मुंगीसारखे डोक्याने चालायला शिका, पायाने चालतात ते अंतर कापतात आणि डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात, असेही महाराव म्हणाले