नागपूर : राज्यात दरमहा महावितरणचे १२ लाख घरगुती वीज ग्राहक मुदतीनंतर वीज देयक भारतात. मुदत न पाळल्यामुळे या ग्राहकांना दंड भरावा लागला. हा दंड किती असतो? हे आपण बातमीत बघू या.

चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत की, ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरलीत. पण मुदत संपल्यानंतर या ग्राहकांना सव्वाटक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. तर व्यावसायिक संवर्गातील १ लाख ३३ हजार आणि औद्योगिक संवर्गातील १७ हजार ग्राहकांनाही विलंबाने देयक भरले. त्यामुळे त्यांनाही दंड भरावा लागला.

हेही वाचा – कन्हान नदीला पूर, नागपूरच्या पाणी पुरवठ्यावर काय होणार परिणाम?

हेही वाचा – “राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वेक्षण करावे”, आमदार जोरगेवार यांची मागणी; म्हणाले, “आंदोलकांच्या भावना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर देयक भरणा, ऑनलाइन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर सवलत मिळते. मुदतीपूर्वी देयक भरल्यास प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर देयक भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळत असल्याचेही महावितरणचे म्हणणे आहे.