चंद्रपूर : विविध मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवू असे अश्वासन दिले आहे.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्हात मुला मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण पंडालाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा – पाऊस कमी तरीही गडचिरोलीत पूरस्थिती, राष्ट्रीय महामार्ग बंद

हेही वाचा – कन्हान नदीला पूर, नागपूरच्या पाणी पुरवठ्यावर काय होणार परिणाम?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी टांगे यांच्या प्रकृतीची विचारणा करत त्यांच्या संपूर्ण मागण्या समजून घेतल्या आहे. शिंदे – फडणवीस सरकार ओबीसी समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आंदोलकांच्या भावना आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.