Doctor Nurse of molestation crime filed police Nagpur news ysh 95 | Loksatta

वर्धा: डॉक्टर तुम्हीसुद्धा! परिचारिकेस मिठी मारून…

दवाखान्यातील परिचारिकेस मिठी मारून चुंबन घेतल्याप्रकरणी एका डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वर्धा: डॉक्टर तुम्हीसुद्धा! परिचारिकेस मिठी मारून…
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

वर्धा: दवाखान्यातील परिचारिकेस मिठी मारून चुंबन घेतल्याप्रकरणी एका डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टर यशवंत हिवंज याचे कारला चौकातील दवाखान्यात हा गुन्हा सकाळी नऊ वाजता घडला.

दवाखान्यात एकटी असल्याची संधी साधून डॉ. हिवंज याने सदर परिचारिकेस स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. एका रुग्णामुळे आज आपल्याला पाच हजार रुपयांचा फायदा झाला. तुझ्यामुळेच फायदा झाल्याचे म्हणत हातात हात मिळवला व हाताचे चुंबन घेतले. मिठीतही कवटाळले. त्यामुळे धक्का बसलेल्या परिचारिकेने ओरडा केला.

हेही वाचा >>> नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीचे छापे; मध्य भारतात खळबळ

हा प्रकार तिने आपल्या सहकाऱ्यांना बाहेर येत रडत रडत सांगितला. त्यांनी घरी जाण्याचा सल्ला दिला, घरच्यांनी हा प्रकार ऐकताच पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तक्रार झाल्यावर रामनगर पोलिसांनी डॉ. हिवंज विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत चौकशी सुरू केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 09:21 IST
Next Story
प्रतीक्षा संपली, आज पहिली घंटा!; ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला नागपूरमधून सुरुवात