नागपूर : जर तुम्ही श्वानप्रेमी असाल किंवा तुम्ही श्वान पाळत असाल, तर हा एक असा प्राणी आहे जो त्याच्या माणसांवर खूप प्रेम करतो आणि नेहमी त्यांच्याशी निष्ठावान राहतो. घरात पाळलेली श्वान हे बरेच वेळा त्याच्या मालकाच्या मागे-मागे चालताना दिसतात. कधी कधी तुम्हाला श्वानांच्या या कृती गोंडस वाटतात, तर कधी ते सतत पाहून तुम्ही त्रस्त होत असाल. पण श्वान असे का करतात हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का, श्वान नेमके असं का करतात.

या विषयावर वेगवेगळ्या पशुप्रेमींची किंवा पशुतज्ञांची वेगवेगळी मते आहेत. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हेमंत यांच्या मते, श्वान हे आजच नाही तर शतकानुशतके मानवासोबत राहत आली आहेत, परंतु हा असा प्राणी आहे ज्याला कळपात राहायला आवडते, म्हणून जेव्हा कुत्रा एकटा असतो तेव्हा तो त्याच्या मालकाच्या जवळ जातो किंवा मागे-मागे फिरतो. बऱ्याचदा कुत्रे मालकाला आणि त्याच्या कुटुंबाला आपले कुटुंब समजू लागतात आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तो कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा त्याचा मालक कुठेतरी जाताना पाहतो तेव्हा तो त्यांच्या मागे जातो. श्वानावर प्रेम असणे हेदेखील एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – बुलढाणेकरांनो सावधान! हेल्मेट असेल तरच जिल्हा कचेरीत मिळेल प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कधीकधी श्वान तुमचा पाठलाग करतात कारण त्यांना भूक लागली आहे. तुम्ही श्वानाला पाहिले की ज्यांना तुम्ही रोज दूध बिस्किट खाऊ घालता ते रस्त्यावरचे भटके श्वान तुम्हाला पाहताच तुमच्या मागे लागतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, त्यांनी तुम्हाला पाहिले आहे आणि आता ते तुमच्याकडून दूध बिस्किटांची अपेक्षा करतात. श्वान मालक घरी येत असेल किंवा घराचे दार वाजवले तरी श्वानाला आपले मालक आले आहे हे कळत असते. बडकस चौकातील एक व्यक्ती दररोज शहरातील महाल परिसरातील ५० भटक्या श्वानांना दूध चपाती किंवा दूध-बिस्किट देत असतो. तो व्यक्ती चौकात दिसला की परिसरातील श्वान त्याच्या मागे येतात आणि तो सर्वाना भांड्यात दूध चपाती देत असतो.