नागपूर : अनेकांच्या स्मार्टफोनवर सकाळी एक अलर्ट मेसेज आला. भारत सरकारच्या नावाने आलेला हा मेसेज नेमका काय आहे? हे न कळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु यात चिंता वाटून घेण्याचे काही कारण नाही. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने या अलर्टच्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेतली. त्याचा हा मेसेज होता, असे जिओकडून कळवण्यात आले आहे.

हेही वाचा – लोकसेवा आयोगाने पात्र ठरविलेल्या अभियंत्याच्या नियुक्त्या अद्याप रखडलेल्याच

हेही वाचा – ओबीसी कोट्यातून आरक्षण, मराठा महासंघ दिल्लीत धडकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर काळजी करू नका. यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या स्मार्टफोनला कोणताही धोका नाही. भारत सरकारच्या विभागाकडून करण्यात आलेली ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.
टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेल्या या चाचणी संदेशात मराठी भाषेतही अलर्ट आला होता. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळात म्हणजे १०.३१ वाजता मराठीमध्ये एक अलर्ट आला. पण घाबरून जाऊ नका, मसेज बघा आणि दुर्लक्ष करा, असे जिओने कळवले आहे.