नागपूर: राज्यघटना लिहिली जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भारताला हिंदू राष्ट्र करण्याबाबत दबाव टाकला जात होता. परंतु, त्यांनी या दबावाला भीक घातली नाही, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (सीपीआय) सरचिटणीस व माजी खासदार डी. राजा यांनी केले.

कॉम्रेड एच.एल. परवाना मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने ‘परवाना ओरेशन-२०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सी.एच. वेंकटचेलम, रामकुमार गुप्ता, सुरेश बोभाटे, डी.एस. बुचे, जे.एस. गुरव, राम नेरकर, बी.एन.जे. शर्मा उपस्थित होते.

डी. राजा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधण्याची मागणी अमान्य केली होती. तसेच त्यांनी अध्यक्षीय लोकशाही देखील नाकारली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारची लोकशाही म्हणजे हुकूमशाहीला चालना होती. आंबेडकरांमुळेच आज आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही आहे.

हेही वाचा… नागपूर विद्यापीठाला शंभर वर्षांचा इतिहास, १९५० ला आले होते पहिले राष्ट्रपती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्योगपती गौतम अदानी आणि देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाचे एकच मूल्य आहे. पण, येथील नागरिक आणि गौतम अदानी समान आहोत, असे मात्र आपण म्हणू शकत नाही. एवढी आर्थिक, सामाजिक दरी या देशात निर्माण झाली आहे. या विषमतेला खतपाणी घालण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. करीत राज्यघटना, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला आगामी निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन डी. राजा यांनी केले.