ऑनलाईन पद्धतीचा दलालांकडून गैरवापर;  ‘लोकसत्ता’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गैरप्रकार उघड

महेश बोकडे

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

नागपूर : राज्यातील आरटीओ कार्यालयांतील दलाल संस्कृती संपवण्यासाठी परिवहन खात्याने वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ऑनलाईन देणे सुरू केले. परंतु या सुविधेचा राज्यभरात गैरवापर सुरू आहे. अनेक दलाल उमेदवारांकडून मोठी रक्कम उकळून स्वत:च परीक्षा देत परवाने वाटत आहेत. ‘लोकसत्ता’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, या स्टिंग ऑपरेशनदरम्यान परवाने मिळालेल्या उमेदवारांनी परीक्षाच दिली नाही.

राज्यात १६ प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि ३४ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. १ एप्रिल २०२१ पूर्वी या कार्यालयांत ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण  उमेदवारांनाच वाहन चालवण्याचे शिकाऊ परवाने मिळत होते. परंतु ही कार्यालये भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप  खुद्द केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच केला होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांनी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करून घरबसल्या  ऑनलाईन शिकाऊ परवाने देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

राज्याच्या परिवहन खात्यानेही  काम पारदर्शी करण्यासाठी राज्यात एप्रिल २०२१ पासून या पद्धतीने शिकाऊ परवाने देणे सुरू केले. या पद्धतीतही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा देणे बंधनकारक आहे. परीक्षेसाठी रस्ते वाहतुकीच्या नियमांची जाण आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही. परंतु, अनेक ठिकाणी दलाल उमेदवारांकडून नियमबाह्य पैसे उकळत स्वत:च ही परीक्षा देतात व  कुणालाही क्षणात  परवाने मिळवून देतात. त्यामुळे असामाजिक तत्त्वांच्या हातातही सहज परवाना मिळून अनुचित प्रकार घडण्याचा धोका नकारता येत नाही. लोकसत्ताने हा वाईट प्रकार पुढे आणून त्यात सुधारणेच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते पवन कुमार अरोरा, अकबन खान कादर खान, अक्षय अशोक शेंडे, मोहम्मद आसिफ बशीर या चौघांच्या मदतीने  स्टिंग ऑपरेशन केले. त्यानुसार १३ मार्च २०२२ रोजी चौघेही दोन तासांसाठी लोकसत्ता, नागपूर कार्यालयात आले. त्यांनी येथून दलालांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर या सगळय़ांना कोणतीही परीक्षा न देता व अर्जही न भरता दलालांकडून  व्हॉट्सअॅळपवर परवाने उपलब्ध करण्यात आले.

असे झाले स्टिंग ऑपरेशन..

लोकसत्ताच्या मदतीने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पवन अरोरा यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी नागपूर शहर, पूर्व नागपूर, ग्रामीण आरटीओ कार्यालयाजवळ  बसलेल्या दलालांशी दोन दिवसांपूर्वी प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर १३ मार्चला दुपारी नागपुरातील लोकसत्ता कार्यालयात दोन तास बसून  भ्रमणध्वनीवर दलालांशी संपर्क साधला. त्यांना  काही पैसे ऑनलाईन वळते केले. सोबतच आधार कार्डही व्हॉट्सअॅतपवर पाठवले.  प्रथम शिकाऊ व एक महिन्याने कायम परवान्यासाठी प्रत्येकी साडेसहा ते सात हजारात सौदा पक्का झाला.  दोन तासांतच दलालांकडून परीक्षा न देताच व्हॉट्सअॅठपवर परवाने मिळाल्याचे पवन अरोरा यांनी सांगितले.  दरम्यान, याबाबत विचारणा करण्यासाठी परिवहन मंत्री अॅनड. अनिल परब व राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

चारही परवाने अधिकृत

 लोकसत्ताच्या सदर प्रतिनिधीने नागपूर शहर, पूर्व नागपूर, नागपूर ग्रामीण या तिन्ही आरटीओ कार्यालयात संपर्क साधत या चारही परवान्याच्या वैधतेबाबत विचारणा केली असता ते अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर, शहर) रवींद्र भुयार म्हणाले, आरटीओ कार्यालयात पारदर्शी पद्धतीने ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच शिकाऊ परवाने दिले जातात. घरबसल्या परवाने घेणाऱ्यांची माहिती आमच्याकडे नसते. त्यामुळे कुणी चुकीच्या पद्धतीने परवाने घेताना आढळल्यास  कारवाई केली जाईल.

दलाल म्हणतात, घाबरू नका!

 लोकसत्ताकडे स्टिंग ऑपरेशनसाठी आलेल्या चारही सामाजिक कार्यकर्त्यांनी शिकाऊ परवान्याची पद्धत जाणून घेण्यासाठी दलालांशी संपर्क साधला असता सगळय़ांनी  कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. शिकाऊ परवाना आमच्याकडे न येताच मिळेल, कायम परवान्यासाठी एक मिनिटात कार्यालयात केवळ छायाचित्र काढून जाता येईल, असेही त्यांनी सांगितले.