महाविकास आघाडीची सत्ता असताना महापालिकेला निधी मिळत नाही, अशी ओरड करणारे भाजप नेते आता राज्यात पक्षाची सत्ता असूनही निधीअभावी महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले असताना गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे रखडलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये भाजप नेते व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी घोषित केलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेत प्रशासकीय राजवटीला जवळपास ९ महिने झाले आहेत. शहर स्वच्छता अंतर्गत अनेक प्रकल्प मार्गी लावले जात असले तरी तिवारी यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प आजही प्रलंबित आहेत, काही प्रकल्पासाठी निधी नसल्याने ते मार्गी लागलेले नाही. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते महापालिकेला जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप करीत होते. आठ महिन्यांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. तरी अनेक प्रकल्प निधी नसल्यामुळे रखडले आहेत. अजूनही महापालिका प्रशासनाला ५०० कोटींच्यावर देणी बाकी असून उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाला आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने आता कडक मोहीम हाती घेतली आहे. तरी चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. सिमेंट रस्त्यांची कामे, भांडेवाडीतील प्रकल्प अर्धवट आहे. डांबरी रस्त्याचा प्रश्न कायमच आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the financial crisis of nagpur municipal corporation many projects were stalled vmb 67 amy
First published on: 25-01-2023 at 09:57 IST