लोकसत्ता टीम
नागपूर: नागपूर आणि दिल्ली दरम्यान एकही थेट नाही, बहुतांश गाड्या नागपूर मार्गे धावतात. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जीटी, राजधानी एक्सप्रेस आदी गाड्या येथून जातात. आता आणखी एक गाडी मिळणार आहे.
यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरांतो एक्स्प्रेसला नागपुरातही थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता २६ ऑगस्टपासून सुटणारी गाडी क्रमांक १२२१३ यशवंतपूर – दिल्ली सराय रोहिला दुरंतो एक्स्प्रेस दुपारी ४:१५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि ५ मिनिटांच्या थांब्यानंतर ४:२० वाजता दिल्लीकडे रवाना होईल.
आणखी वाचा- महिलांची खासदार पुरस्कृत अयोध्या वारी, प्रभू रामदर्शन की निवडणूक तयारी?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दिल्लीहून येणारी गाडी क्रमांक १२२१४ दुपारी १:२५ ला नागपूर स्थानकात येईल आणि १:३० वाजता यशवंतपूरकडे रवाना होईल.