लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यात गेल्या अडीच वर्षात ‘लेना’ बँक होती आता महायुतीचे सरकार आल्यानंतर ‘देना’ बँक झाली आहे. पूर्वी शिवसेनेत मालक होते, बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे. हे ( उद्धव ठाकरे) मात्र घरगडी समजत होते. आमच्या शिवसेनेत कोणी मालक नाही. जो काम करणार तो आपल्या पक्षात राजा असणार, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

रामटेक लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नागपुरात देशपांडे सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 

आणखी वाचा-‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती

पूर्वी मातोश्रीवर जाण्यासाठी नेत्याला आणि कार्यकर्ताला तासनतास वाट पहावी लागत होती मात्र वर्षावर २४ तास गर्दी असते व रात्री उशिरापर्यंत शेवटच्या माणसांशी संवाद साधला जातो आणि हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे, असे शिंदे म्हणाले. गेल्या दीड पावणे दोन वर्षात जे काम केले आहे ते सर्वासमोर आहे, मला मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता. मला धनयुष्यबाण मला वाचवायचा होता. शिवाय बाळासाहेबांचा विचार सोडून ते काम करत असल्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. आम्ही त्यावेळी चुकीचे काम केले असते तर तुमाने सोबत आले असते का असेही असेही शिंदे म्हणाले.

आपला पक्ष हा कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे उद्या तुमच्यातील एखादा कार्य कर्तृत्वाचा जोरावर मुख्यमंत्री झाला तर मला सर्वात जास्त आनंद होईल..