वाशीम : सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एकाच वाहनातून नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या मार्गाची प्रत्यक्ष वाहनाद्वारे पाहणी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व:त कार चालवली. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या बाजूला बसून होते. विशेष म्हणजे, त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा वेग १८० च्या पुढे असल्यामुळे पाहणी दौऱ्यादरम्यान काय त्या गाड्या, काय त्यांचा वेग, अशी एकच चर्चा रंगली होती.

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन टोकांना जोडणारा समृद्धी महामार्ग देशातील सहा लेनचा सर्वात मोठा मार्ग असून ७१० किमीचे अंतर केवळ सहा तासात गाठता येणार आहे. हा मार्ग राज्यातील १० जिल्ह्यांना जोडून ३९२ गावातून जात आहे. या मार्गावर ५० पेक्षा जास्त उड्डाणपूल आहेत. समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती मिळणार असून ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ डिसेंबर रोजी एकाच वाहनातून मार्गाची पाहणी केली. वाशीम जिल्हयातील ईरळा ता. मालेगाव येथील बेस कॅम्पजवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ताफा अत्यंत वेगाने आला आणि तेवढ्याच वेगाने पुढे निघूनही गेला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या डीबी पथकाची वाहने आणि इतर महागडी वाहने मागेच होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा वेग पाहून प्रत्येकांच्या तोंडी काय त्या गाड्या, काय त्यांचा वेग, बस एवढीच चर्चा रंगली होती.

हेही वाचा: समृध्दी महामार्गाच्या पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘त्या’ कारची विशेष चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत असलेल्या ‘मर्सडीज बेन्ज’ कंपनीच्या एम एच ४९ बीआर ०००७ या निळसर रंगाच्या वाहनाच्या वेगाने अनेकांना अचंबित केले. यावेळी अनेकांनी ही महागडी कार असून तिची किंमत १.७२ कोटी रुपये असल्याचे सांगितले. ही कार स्वत: उपमुख्यमंत्री फडणवीस चालवत होते. तर बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते. या ताफ्यात ही कार सर्वात पुढे तर इतर वाहने तिच्या मागे धावत होती.