वर्धा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे २ एप्रिल रोजी निघणाऱ्या अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार आहे. नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काळे यांनी हा दिवस निश्चित केला आहे. या दिवशी काळे यांच्या आई अनुराधाताई शरद काळे यांचा स्मृतिदिन आहे. आईच्या स्मृतीस अभिवादन करीत आपण निवडणूक कार्यास आरंभ करणार असल्याचे ते म्हणत आहे. मात्र या रॅलीत आता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे पण उपस्थित राहून काळे यांना आशीर्वाद देणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून आज कळविण्यात आले. पक्षनेते अतुल वांदिले तसेच इंडिया आघाडीचे निमंत्रक अविनाश काकडे यांनी पवार यांची हजेरी निश्चित असल्याचे सांगितले.तसेच माजी मंत्री अनिल देशमुख पण उपस्थित राहणार आहे.

अमर काळे हे केवळ एका पक्षाचे उमेदवार नसून ते इंडिया अलायन्सचे म्हणजे लोकशाही व संविधानावर विश्वास करणाऱ्या सर्व पक्ष व संघटनाचे उमेदवार आहेत. हुकूमशाही वृत्ती हाणून पाडणे व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी समविचारी लोकं एकत्र आले आहेत. त्यांची सभा रविवारी सायंकाळी संपन्न झाली, असे काकडे यांनी नमूद केले.त्यात अमर काळे, अनिल देशमुख, प्रा.सुरेश देशमुख, शेखर शेंडे, हर्षवर्धन देशमुख, सुधीर कोठारी, अतुल वांदिले, मनोज चांदुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा… धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

हेही वाचा… Maharashtra News Live : “रोज नवे जोक, देशात जॉनी लिव्हरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राऊतांचा टोला

या आघाडीत माकप, भाकप, प्रहार, आप, भारत मुक्ती मोर्चा, रिपाई, आदिवासी विकास परिषद, संभाजी ब्रिगेड, किसान अधिकार अभियान तसेच अन्य संघटना जुळल्या असल्याचे सांगण्यात आले.