लोकसत्ता टीम

बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी शेगाव येथून एल्गार रथयात्राला जोशात प्रारंभ झाला. यावेळी हजारो कार्यकर्ते व शेतकरी यांच्या साक्षीने बोलताना तुपकर यांनी ही आरपारची लढाई असल्याचे सांगितले.

आज संतनगरीत दाखल झाल्यावर तुपकरांनी एल्गार यात्रेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. यानंतर ते सपत्नीक गजानन महाराज समाधीस्थळी नतमस्तक झाले. यानंतर रणरणत्या उन्हात यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या अग्रभागी तुपकर दाम्पत्य, प्रमुख पदाधिकारी होते. यावेळी बोलताना तुपकर यांनी कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. अस्मानी सुलतानीचा जबर फटका बसलेले लाखो उत्पादक राजदरबारी उपेक्षित आहे. त्यामुळे सत्ताधार्यांना जागे करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे ते म्हणाले. हे आंदोलन आरपारची लढाई असल्याचे सांगून बुलढाण्यात २० नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्च्यात हजारोंच्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन तुपकरांनी केले.

आणखी वाचा-आमदार रणजीत कांबळे पुन्हा वादात, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा आहे कार्यक्रम

यात्रा पहिल्या दिवशी खामगाव तालुक्यात असणार आहे. त्यानंतर मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, बुलढाणा, मोताळा मार्गे पुन्हा बुलढाणा येथे पोहचणार आहे. २० नोव्हेंबर रोजी यात्रेचा समारोप बुलढाण्यातील एल्गार मोर्च्या ने होणार आहे. सोयाबीन -कापसाला दरवाढ , येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई ,पिकविमा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.