राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षांचे प्रवेश घेण्यासाठी एका आठवडय़ाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी विद्यापीठाने  वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना ११ ऑगस्टपर्यंत नोंदणी करून महाविद्यालयांनी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी असे कळवण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ न शकल्याने ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, ३ सप्टेंबपर्यंत आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आली. या वाढीव मुदतीतही सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ न शकल्याने या प्रक्रियेला ३० सप्टेंबपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राचार्य फोरमने ही मुदतवाढ देण्याची मागणी नुकतीच कुलगुरूंकडे केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension till 30th september degree admission ssh
First published on: 23-09-2021 at 03:24 IST