नागपूर : एका वृद्ध व्यवस्थापकाला लुटल्यानंतर बारबालावर लाखो रुपये उधळणार्‍या दोघांना जरीपटका पोलिसांनी मुंबईत अटक केली. दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांना नागपुरात आणले. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली. तपीश बागडे आणि रुषभ कावळे, रा. जरीपटका अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत राणी दुर्गावती चौकात गजभिये यांची भारत गॅस एजन्सी आहे. एजन्सीत पखाले (६०) हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवार १७ जुनला दुपारच्या सुमारास तीन लाखांची रक्कम घेवून एजन्सीतून स्कुटीने निघाले. लघूवेतन कॉलनीच्या मार्गावरून जात असताना डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या मागच्या भागात आरोपी त्यांच्या मागावर होते. एकाने त्यांच्या दुचाकीला लात मारली. त्यामुळे दुचाकीचे संतूलन बिघडून ते खाली पडले. त्याच वेळी त्यांच्या जवळील तीन लाख रुपये लुटले आणि पळाले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास केला. मात्र, आरोपींचा काही सुगावा लागला नाही.

हेही वाचा – चार राज्यस्तरीय पथकांचा गोंदिया जिल्ह्यात ठिय्या, १७७ धान खरेदी केंद्रांची तपासणी, खरेदीतील घोटाळे थांबविण्याचा खटाटोप

दरम्यान आरोपी मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले. एसीची हवा आणि चविष्ट भोजनावर ताव मारायचे. बारमध्ये जावून बारबालांवर पैसे उधळत होते. तीन चार दिवस मौजमस्ती केली. पत्ता लागू नये म्हणून त्यांनी जुना सीम काढला. नवीन मोबाईल खरेदी केला. मात्र, जरीपटका पोलिसांनी त्या दोघांनाही हुडकून काढले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट, गजानन निशीथकर, अमोल हरणे, पवन यादव यांनी केली.

हेही वाचा – वर्धा : महाविद्यालयाच्या खरेदी विक्रीत मालक राहिले बाजूलाच, प्राचार्यालाच चोपले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची घेतली गंभीर दखल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले. तत्पूर्वी तांत्रिक तपास करून त्यांचे लोकेशन मिळविले. पथकाने मुंबई गाठली. रस्त्याने जात असतानाच त्यांच्या मुसक्या आवळल्या.