चंद्रपूर: महायुतीत सहभागी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यावरून पोस्ट केल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची वेळीच दखल घेऊन जोरगेवारांच्या सोशल मीडिया टीमने फेसबुकला तक्रार दिली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच फेसबुक अकाऊंट हॅक केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

प्रत्येक जनप्रतिनिधी संवादासाठी म्हणून सोशल मीडियाचा वापर करत असतात. आमदार किशोर जोरगेवार यांचेसुद्धा फेसबुक, द्विटर यासह विविध सोशल मीडियावर अकाऊंट आहे. त्याचे फालोअर्सही मोठ्या प्रमाणात आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या फेसबुक व द्विटर आयडीवर तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी सोशल मीडियाची टीम काम करत होती. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक करून द्विटरवरून एक-दोन पोस्टसुद्धा केल्याचे समोर आले. लोकप्रतिनिधीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

दरम्यान, आमदार जोरगेवारांनी याबाबतची तक्रारी इ-मेलद्वारे सोशल मीडिया टीमला दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांकडून वॉच ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

हेही वाचा – ५४ वर्षांनंतर कॉंग्रेसकडून चंद्रपूरमध्ये महिला उमेदवार

पोलीस अधीक्षकांना पत्र देणार

फेसबुक आणि द्विटर अकाऊंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आमच्या सोशल मीडिया टीमने दिली होती. त्याच्यावर ते कामसुद्धा करीत आहेत. फेसबुकला आम्ही ई- मेलद्वारे कळविले आहे, पोलीस अधीक्षकांनाही आम्ही पत्र देणार आहोत.