scorecardresearch

नागपूर: फडणवीस, बावनकुळेंच्या जिल्ह्यातील ग्रा.प. निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती

खास रणनीती तयार करण्यात आली आहे त्यात दोन ग्रामपंचायती साठी एक नेता असे नियोजन करण्यात आले आहे.

नागपूर: फडणवीस, बावनकुळेंच्या जिल्ह्यातील ग्रा.प. निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून २३६ पैकी १५० ग्रामपंचायती जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी खास रणनीती तयार करण्यात आली आहे. दोन ग्रामपंचायती साठी एक नेता असे नियोजन करण्यात आले आहे.

 १८ डिसेंबरला जिल्ह्यातील २३६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. नागपूर हा खुद्द प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील निवडणुका होणार असल्याने भाजपने ती प्रतिष्ठेची केली आहे. मंगळवारी जिल्हा भाजपाची बैठक झाली. दोन ग्रामपंचायतींसाठी  एका नेता या प्रमाणे प्रभारी नियुक्ती करून  जबाबदारी निश्चित केली आहे.प्रभारी नेत्यावर स्थानिक कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर करून एकच पॅनल उभे करण्यावर भर देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; वाचा राज्यभरातील घडामोडी एका क्लिकवर

ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी विधानसभा क्षेत्र निहाय आढावा घेऊन त्या विधानसभा क्षेत्रातील नेत्यांवर ग्रामपंचायत निवडणुकांची जबाबदारी दिली आहे, असे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी सांगितले. विधानसभा मतदारसंघ निहाय जबाबदारी नेत्यांना देण्यात आली. त्यानुसार काटोल विधानसभा क्षेत्राची जबाबदारी  चरण सिंग ठाकूर, व  किशोरजी रेवतकर,सावनेर विधानसभा – डॉ राजीव पोतदार व  इमेश्वरजी यावलकर, रामटेक – डी मल्लिकार्जुन रेड्डी, व अविनाशजी खळतकर, उमरेड – सुधीर पारवे, व आनंद राऊत, हिंगणा – आमदार समीर मेघे व  अनिल निदान आणि कामठी- विधानसभा क्षेत्राची जबाबदारी आमदार टेकचंदजी सावरकर अजय बोढारे २डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

हेही वाचा >>> नागपूर: भाजपच्या माजी आमदाराला मिळालेले पुरस्कार, सन्मान चिन्हे पदपथावर विक्रीला

विधानसभा मतदारसंघ निहाय

 ग्रामपंचायत निवडणुका

काटोल   -५१

सावनेर   -५९

उमरेड  -२१

कामठी -४०

हिंगणा  -२२

रामटेक   -४३

एकूण-२३६

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 13:10 IST

संबंधित बातम्या