गोंदिया : ‘धानाचे कोठार’ अशी गोंदिया – भंडारा या जिल्ह्यांची ओळख, दोन्ही जिल्ह्यांत धानाची पिके प्रामुख्याने घेतली जातात. यंदाच्या खरीप हंगामासाठी गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण तयारी केली आहे.

मागील पंधरवड्यात सूर्य आग ओकत असतानाही ४० ते ४२.५ तापमानात बळीराजाने ९० टक्के शेतजमिनीची मशागत करून ती पेरणीसाठी तयार ठेवली आहे. तथापि, मान्सून रखडल्याने या पेरण्या लांबणीवर पडल्या असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हेही वाचा – नागपूर : पत्नीने आंघोळ करण्यास नकार दिला, चिडलेल्या पतीने..

शेतकऱ्यांचे डोळे आता सातत्याने आकाशाकडे लागले आहेत. वादळ, वारा सुटला किंवा किंचितही ढग दाटून आले तर शेतकऱ्यांच्या मनात आशेची पालवी फुटते. पण आजतागायत पावसाच्या सरी न बरसल्यामुळे निराशाच पदरी पडली आहे.

यंदा ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रभावावर परिणाम होत असून, केरळमध्ये होणारा त्याचा परिणाम हळू असेल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून, त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल आणि त्यानंतर पुढील तीन दिवसांत ते उत्तर वायव्य दिशेने सरकेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. त्याचा मान्सूनवर परिणाम झाला असून, निर्धारित वेळेपेक्षा मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहेत. विद्यमान स्थितीत शेतकऱ्यांची सर्व शेतीकामे पूर्ण आटोपून त्याचे नियोजनही झाले आहे.

हेही वाचा – गडचिरोली: संतापजनक! अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांचा बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषी विभागाने नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना बदल दरानुसार लागणारे बियाणे आणि खते उपलब्ध करण्यात आले आहे, तर जमिनी पेरणीसाठी तयार असल्याने वेग देत कामे उरकून घेतली. आता जमिनी पेरणीसाठी तयार असल्याने मृग नक्षत्राच्या जोरदार पावसाची आता प्रतीक्षा आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार किमान ७५ ते १०० मिलीमिटर पावसानंतरच पेरणी करणे शक्य होणार आहे. आता मान्सून लांबला असताना पुढे पाऊस कसा आणि किती पडेल याची शाश्वती नाही. भात पिकाकरिता भरपूर पाण्याची गरज असते, त्यामुळेही यंदा सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.