वर्धा : समृद्धी महामार्गावर जिल्ह्यातील सर्वात भीषण अपघात घडला आहे. सेलू लगत कोटांबा फाटा येथे सोळा चाकी ट्रक क्र. एम.एच. ४० बी.एल. ८२३५ ला अल्टो एम.एच. ३७ जी ३५५८ या कारची धडक बसली. रात्री हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. अपघातात वाशिम येथील कारचालक डॉ. ज्योती भरत क्षीरसागर व त्यांची मैत्रिण डॉ. फाल्गुनी सुरवाडे रा.अमरावती, तसेच वडील भरत दत्तात्रय क्षीरसागर रा.वाशिम हे तिघेही ठार झाले. हेही वाचा - गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण, पण दोषींना सोडणार नाही! देवेंद्र फडणवीस यांचा इशारा हेही वाचा - गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण, पण दोषींना सोडणार नाही! देवेंद्र फडणवीस यांचा इशारा आज पोलीस भरती परीक्षा सुरू झाल्याने वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचू शकले नाही. तसेच संबंधित ठाणेदार यांच्याशी संपर्क होवू न शकल्याने विस्तृत माहिती मिळू शकली नाही.