चंद्रपूर:अभ्यासासाठी वडिलांकडून वारंवार होणारा तगादा बघून मुलाने तुम्ही तर दहावीची परीक्षा नापास झाले होते. तुम्ही दहावी पास होऊन दाखवा असे आव्हान दिले. मुलाने दिलेले आव्हान आनंदाने स्वीकारत अठ्ठावीस वर्षांनंतर वडिलांनी दहावीची परीक्षा दिली आणि पास देखील झाले. याउलट दहाव्या वर्गात असलेला मुलगा नापास झाला. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील दहावी पास झालेले वडील अनिल कडगलवार व दहावी नापास मुलगा प्रिन्स यांच्या निकालाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील अनील कडगलवार हे रोजीरोटी करून आपल्या कुटुंबाच रहाटगाडग चालवितात. त्यांना दोन मुल आहेत. आपण आपल्या आयुष्यात काही करू शकलो नाही. पण आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, मोठ व्हाव हे स्वप्न त्यांनी बघितलं. आयुष्यात आलेल्या अनेक संकटानंतर शिक्षणाची इच्छा होती. पण १९९७ साली ते दहावीची परिक्षा नापास झाले अनं त्यांची शाळा पुर्णत सुटली. शिक्षणाची भागनड सोडून ते संसारात रमले.bदोन मुलांची जबाबदारी असल्यानं त्यांनी अधिक काबाडकष्ट करित मुलाच्या भविष्यासाठी कंबर कसली.bकडगलवार यांचा लहान मुलगा प्रिंस हा यंदा दहावीत होता. दहावीच वर्ष शैक्षणीक आयुष्यासाठी टर्नींग पांईट असते.
यामुळे ते मुलाला चांगला अभ्यास करण्याबाबत नेहमी टोकायचे. चांगला अभ्यास करशील तर तुझच भविष्य घडेल असे सांगायचे. पण तो खोडकर होता. वडील वारंवार अभ्यास करायला सांगतात यामुळे संतापलेल्या मुलाने एक दिवस तुम्ही तर दहावीची परिक्षा नापास झाले अनं आता मला सांगत आहात असा उपरोधिक टोमणा मारला.मुलाचा हा टोमणा बापाच्या चांगलाचा जिव्हारी लागला. १९९७ साली दहावीची परिक्षा नापास होणा-या अनील कडगलवार यांनी पुन्हा मनात जिदद भरली. पोराला सांगितले.
तुझायासोबत दहावीची परिक्षा देतो.बघूया असे म्हटले.अनं ते कामाला लागले.सतरा नंबरचा परिक्षा फार्म भरला.अनं अभ्यासालाही लागले.आपल्या या आव्हानान मुलाला अभ्यासाची ओढ लागेल एवढाच त्यांचा हेतू होता.दहावीची परिक्षा झाली.बापलेकांनी परिक्षा दिली.अनं आज निकाल जाहीर झाला.वडिलांनी परिक्षा उत्तीर्ण केली.मुलगा प्रिंस मात्र चक्क चार विषयात नापास झाला.आज हा निकाल अनेकांना प्रेरणेची मशाल देणारा ठरला.आव्हानांना पेलविण्याची जिदद असली कि काहीही अशक्य नसत हे अनील यांनी दाखवून दिलयं.
या आगळयावेगळया अनं आव्हानात्मक निकालाची आता चौफेर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे २८ वर्षापूर्वी वडील नापास झाले होते तेव्हा दहावीचा अभ्यासक्रम व आताचा अभ्यासक्रम यात बराच बदल झालेला आहे. त्यामुळे वडिलांच्या उत्तीर्ण होण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.