लोकसत्ता टीम

बुलढाणा: राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चिखली नगरीतील सैलानी नगर येथे दोन भिन्न धर्मीय गटात राडा झाला. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची संख्या वाढणार आहे. सध्या घटनास्थळासह चिखलीत तणावपूर्ण शांतता असून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

चिखली साकेगाव मार्गावरील सैलानी नगर येथे काल रात्री साडेदहा वाजता हा संघर्ष उडाला. लग्नात डीजेवर लावण्यात आलेल्या गाण्यावरून दोन गट समोरासमोर आले. यावेळी झालेल्या वादावादीचे रूपांतर मारहाणीत झाले. दोन्ही गट एकमेकांना भिडले असता दाखल झालेल्या चिखली पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र, जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातून व बुलढाणा येथून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. यानंतर जमाव पांगला.

आणखी वाचा- अमरावती: ‘व्हाट्सॲप’वर एक ‘लिंक’; ‘क्लिक’ करताच खात्यातून अडीच लाख गायब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ मे च्या मध्यरात्रीनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आज बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता तीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. हवालदार राजेश शेषराव बाहेकर यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. तपास चिखली ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धंनजय इंगळे करीत आहेत.