लोकसत्ता टीम

नागपूर : जखिणवाडी येथील मेंढवडा – धनगरवाडा परिसरातील विहिरीत बिबट्याचे दोन बछडांना पडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. विहीर मालक सुखदेव येडगे यांच्यासह ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बछड्यांना विहिरी बाहेर काढले.

रविवारी सायंकाळी बिबट्या मादी तिच्या पिल्लांना परत घेण्यासाठी यावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. पिल्लांना एका विशिष्ट पिंजऱ्यात ठेवण्यात आले व त्याचे दार तीन पुलीच्या सहायाने लांब बांधून ठेवण्यात आले.

आणखी वाचा-मान्सूनला वातावरण अनुकूल! विदर्भ, मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारणपणे पिंजऱ्यापासून पुली ओढणारे २५० फूट लांब अंतरावर २० फूट उंचावर होते. पिंजरा शेजारी हालचाल टिपण्यासाठी केमेरे लावण्यात आले. मादी साधारण रात्री एक वाजता पिंजऱ्याशेजारी घुटमुळू लागली हे कॅमेरामध्ये दिसले, त्या क्षणी पुलीच्या साहय्याने दोर ओढून पिंजऱ्याचे दार उघडून बछड्याना मुक्त करण्यात आले. रेस्क्यू मोहिमेत कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, वनरक्षक कैलास सानप, सचिन खंडागळे, अरविंद जाधव, वाहन चालक योगेश बेडेकर, वनसेवक भरत पवार , अमोल माने, धनाजी गावडे, हनुमंत मिठारे, भाऊसो नलवडे, शशिकांत जाधव, प्राणीमित्र अजय महाडीक, उदित कांबळे, रोहीत कुलकर्णी, गणेश काळे तसेच रेस्कु पुणे चे हर्षद, एजाज, व पशसंवर्धन अधिकारी डॉ ज्योती यांनी सहभाग घेतला होता.