अमरावती: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. या विरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरच्या माध्यमातून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कैलाश सूर्यवंशी नावाच्‍या ट्विटर हॅन्‍डल धारकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

यासंदर्भात प्रदेश कॉंग्रेसचे सचिव हरीभाऊ मोहोड यांनी सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली. आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या ट्विटर हॅन्‍डलवर ३० जुलै रोजी कैलाश सूर्यवंशी नावाच्‍या ट्विटर हॅन्‍डलवरून ‘दाभोळकर असाच ओरडत होता. एक दिवस जन्‍नतमध्‍ये पाठवला. टराटरा फाडून टाकला. हरामखोर कोण आहे, बाई स्‍पष्‍ट करा.’ असे ट्विट केले. तसेच दुसऱ्या ट्विटमध्‍ये ‘दाभोळकर ओरडत होता, एक दिवस जन्‍नतमध्‍ये पाठवला… धारकरी कोथळे बाहेर काढते, लक्षात असू द्या’ या आशयाची ठार मारण्‍याची धमकी देण्‍यात आली, असे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा… बुलढाणा: भिडे गुप्तपणे सभास्थळी पोहोचले परंतु राडा झालाच! वंचित, पँथरच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी कैलाश सूर्यवंशी या ट्विटर हॅन्‍डल धारकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. आपण अशा धमक्‍यांना घाबरत नाही. आपण आपल्‍या भूमिकेवर ठाम आहोत, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.