पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन सरकारने केले असतानाही उपराजधानीत मात्र ७०० पेक्षा जास्त फटाक्याच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा फटाके २० टक्क्यांनी महागले आहेत.शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली आहे. त्यासाठी अनेकांनी पोलीस आणि महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७५६ दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक १५१ दुकाने ही सक्करदरा केंद्राअंतर्गत आहे. आतापर्यंत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे ७५६ दुकानदारांनी नोंदणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक लोकांनी परवानगी न घेता दुकाने थाटल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या आधी शहरातील विविध भागात फटाक्यांची दुकाने थाटली जात असून त्यांना पोलीस आणि महापालिकेतर्फे रितसर परवानगी दिली जाते. आग लागू नये म्हणून ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी दुकानांसाठी जागा दिली जाते. मात्र, यावेळी अनेक विक्रेत्यांनी मिळेल त्या जागी दुकाने थाटली आहे. त्यात इतवारी, गांधीबाग, सक्करदरा, महाल, गोकुळपेठ या भागांचा समावेश आहे. अनेकांनी महापालिकेची परवानगी न घेता वर्दळीच्या ठिकाणी दुकाने थाटली आहे.

हेही वाचा >>>नागपूर : ‘लिंक’ उघडताच वीज ग्राहकाचे २.१४ लाख लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ९१ दुकानांची संख्या वाढली आहे. गेल्यावर्षी ६६५ दुकानदारांनी परवानगी घेतली होती. अनेकांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठेत फटाक्याची दुकाने थाटली आहे. सेंट्रल ॲव्हेन्यूवर मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने असून त्या दुकानांच्या आजूबाजूला कपड्यांसहित फर्निचर, औषधांची दुकाने आहेत. शहरातील विविध भागात उपदर्वी शोध पथकाच्या माध्यमातूुन दुकानांची तपासणी केली जाणार आहे. ज्या दुकानदारांनी महापालिकेच्या नियमाचे पालन केले नाही अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.ज्या फटाके विक्रेत्यांनी दुकानासाठी रितसर नियमाचे पालन करत दुकाने थाटली आहे त्यांना परवनागी देण्यात आली आहे. मात्र जे दुकानदार नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके म्हणाले.