नागपूर : नागपूर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे कतार एअरवेजचे दोहा-नागपूर विमान नागपूरला उतरवण्याऐवजी हैदराबादला नेण्यात आले. या विमानात सुमारे ९९ प्रवासी होते. कतार एअरवेजची दोहा-नागपूर-दोहा आंतरराष्ट्रीय विमानसेवा नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत, दोहा येथून क्यूआर ५९० विमानाने रात्री ८.१० वाजता नागपूरसाठी उड्डाण केले.

हेही वाचा – चंद्रपूर: जिल्हा प्रशासनाच्या नावे खोटा संदेश, उडालेला गोंधळ आणि शाळांना सुट्टी…

हेही वाचा – भंडारा : फेसबुकवरुन जुळले प्रेम!, अल्पवयीन विद्यार्थिनी झाली गर्भवती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियोजित वेळेनुसार हे विमान दुपारी २.५० वाजता नागपुरात उतरणे अपेक्षित होते, मात्र नागपुरात मुसळधार पावसामुळे विमानाचे लँडिंग शक्य झाले नाही. शेवटी विमान हैदराबादकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. कतार एअरवेजचे हे विमान दुपारी ३.२९ वाजता हैदराबादला पोहोचले. तेथे सर्व प्रवाशांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांना नागपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. दरम्यान, रात्री विमान वेळेवर नागपुरात न आल्याने नागपूर विमानतळ प्रशासनाने चौकशी केली असता, विमान हैदराबादला वळविण्याची सूचना देण्यात आली.