भंडारा : जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली असून नद्या, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे आज सकाळी महाराष्ट्र- मध्यप्रदेश ला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्गासह १८ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.महाराष्ट्र – मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या आतंरराज्यीय पुलावरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने महाराष्ट्र – मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे.
हेही वाचा >>> भंडारा: अंघोळीकरिता गेला अन् नदीत बुडाला; शोध सुरू
याशिवाय पवनी तालुक्यातील गुडेगाव, उमरी, जुनोना , माहुली, रेवनी ते कोदुली मार्ग, भंडारा शहरातील लहान पुल वैनगंगा, बीटीबी मार्केट, भोजापुर नाला, मोहाडी तालुक्यात रोहा सुकळी, मांढळ ते सुकळी, महालगाव ते मोरगाव, तुमसर तालुक्यातील तुमसर ते येरली, तुमसर ते पीपरा, तामसवाडी ते उमरवाडा, सिहोरा क्षेत्रातील बपेरा पुल, सिलेगाव पुल, कारधा लहान पुल वैनगंगा खमारी नाला, वरठी, करडी, दाभा ते कोथूर्णा असे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.