नागपूर : नाग नदीवर प्रशासनानेच अनधिकृत बांधकाम केल्याने सधन वस्त्यांमध्ये कधी नव्हे एवढे पुराचे पाणी आले. शुक्रवारच्या पहाटे हे संकट कोसळले. परंतु, अद्याप सरकारी मदत पोहोचलेली नाही, अशा शब्दात डागा ले-आऊट, कॉर्पोरेशन कॉलनी येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुरानंतर आज चौथ्या दिवशीदेखील घरातील खराब झालेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे सुरूच होते.

डागा ले-आऊटमध्ये नाग नदीपासून काही अंतरावर असलेल्या कौस्तुभ अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या सुनंदा बांदरे यांच्या घरातील अन्नधान्य, इतर अत्यावश्यक वस्तू पुरामुळे खराब झाल्या. त्या चार दिवसांपासून घरापासून दूर आहेत. त्यांनी मुलगा, सून आणि दोन नातवंडासह रिकामे असलेल्या तिसऱ्या माळ्यावरील एका घरात आश्रय घेतला आहे. अन्नधान्य, इंधन आणि भांडेकुंडी सर्वच वाहून गेले. चार दिवसांपासून त्यांना मैत्रिणी, नातेवाईकांडून जेवण मिळत आहे. सुनंदा बांदरे यांची मुलगी पुण्याला राहते. मुलीने किरणा सामान ऑनलाईन पाठवला. त्यामुळे आज त्यांना घरचा चहा पिता आला. नातवंडाला मॅगी खायला मिळाली. सरकारकडून मात्र काहीच मदत न मिळाल्याचे बांदरे यांनी सांगितले.

हेही वाचा – वर्धा : आश्रमशाळा विनयभंग प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल

हेही वाचा – आरक्षणात वाटेकरी नको… ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’च्या उपोषणाला नागपुरात सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी ५० लाखांचा खर्च व्यर्थ

डागा ले-आऊट आणि कॉर्पोरेशन कॉलनीजवळ नागनदीला लागून स्केटिंग ग्राऊंड उभारण्यात आले आहे. एवढेच नव्हेतर नागनदीवर जवळपास तीस ते चार फुटांचे सिमेंट काँक्रिटचे स्लॅब टाकण्यात आले आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले. याबाबत सांगताना सुनंदा बांदरे म्हणाल्या, आम्ही गेल्या २५ वर्षांपासून सांगतो आहोत येथे साप येतात. नाग नदी स्वच्छ करा. दरवर्षी ५० लाख रुपये खर्च केले जातात. पण नदी काही स्वच्छ होत नाही.