लोकसत्ता टीम

नागपूर : ‘तो’ एक जागतिक पातळीवर नावाजलेला मोठा फुटबॉलपटू. जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक फुटबॉल फ्रीस्टाइलर्स पैकी ‘तो’ एक आहे, पण तरीही या गोष्टीचा त्याला जराही गर्व नाही आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून तो भारतात येतो आहे. नागपुरातील विद्यार्थी फुटबॉलमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पारंगत व्हावी, हाच त्याचा प्रयत्न आहे आणि यासाठी तो नागपुरात आला देखील. त्याला पाहताच विद्यार्थी भारावले, पण तो सहज त्यांच्यात मिसळला. एवढेच नाही तर फुटबॉलमधील भारताच्या कामगिरीवर देखील तो भरभरुन बोलला. जागतिक पातळीवर नावाजलेला हा फुटबॉलपटू म्हणजेच ‘जेमी नाईट’.

नागपूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने जगातील टॉप टेन ‘फ़ुटबॉल फ्रीस्टाईलर्स’ पैकी एक जेमी नाईट यांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक ‘फुटबॉल फ्रीस्टाइलर्स’ पैकी एक आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून उत्कृष्ट कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे मिळविण्यात सक्षम बनविण्यासाठी पोद्दारतर्फे पुढाकार घेण्यात आला.

यावेळी बोलताना जेमी नाईट म्हणाले, भारतातील हा माझा पाचवा दौरा आहे फुटबॉलमध्ये भारताची क्षमता अफाट आहे आणि अशा समर्पणासह भारत लवकरच जागतिक स्तरावर, कदाचित फिफा वर्ल्ड कपमध्येही, स्पर्धा करू शकेल, असा मला प्रामाणिक विश्वास आहे. भारतात पुन्हा यायला मला खूप आवडले. जेमी नाइट आपल्या अविश्वसनीय नियंत्रण, अचूकता आणि सर्जनशीलतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. २०१७ व २०१८ च्या युईएफए चॅम्पियन्स लीग फायनल्समध्ये मैदानावर अप्रतिम सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या खेळ आणि अद्भुत कामगिरीने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना थक्क केले. जेमीचा ठाम विश्वास आहे की फ्रीस्टाइल फुटबॉल शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसित करण्यात मदत करते आणि वाढीच्या मानसिकतेचे महत्त्व शिकवते. यामुळे पोदार एज्युकेशन नेटवर्कचा सर्वांगीण शिक्षणाला भक्कम पाठिंबा मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोदार म्हणाले, आमच्या शाळेत जेमी नाइट यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी खरोखर प्रेरणादायी अनुभव ठरली. त्यांच्या कलेप्रती असलेली त्यांची समर्पण भावना आणि आवड हे कठोर परिश्रम व दृढ निश्चयाने काय साध्य करता येऊ शकते, याचे शक्तिशाली उदाहरण आहे.