नागपूर: माजी आमदार, माजी महापौर व भाजप नेते प्रा. अनिल सोले यांना विविध संस्था, संघटनांकडून मिळाले ले पुरस्कार व सन्मान चिन्ह पदपथावरील भंगार विक्रेत्याकडे आजवर मिळालेले विविध पुरस्कार व सन्मानचिन्ह  चक्क भंगार विक्रेत्याकडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सन्मानांचा अवमान करण्यासारखा आहे, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. अनिल सोले हे नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार होते.अनेक वर्षे नगरसेवक होते. शहराचे महापौरपदही त्यांनी भूषविले. या  काळात त्यांना अनेक संस्था, संघटनांनी गौरविले होते.

सोले यांना विविध संस्था,संघटनानी दिलेले  सन्मान चिन्ह भांगर विक्रेत्याकडे मिळाले. पदपथावर दुकान थाटून त्याची  तो ५० ते १०० रुपयांत  विक्री करताना दिसून आला. विशेष म्हणजे माजी आमदारांना मिळालेले पुरस्कार विकत घेण्यासाठी काही लोक तिथे  आल होते. पदपथावर ठेवलेल्या पुरस्कारामध्ये प्रा. सोलेंना मिळालेल्या पुरस्कार अथवा सन्‍मानामध्ये गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या सन्मान चिन्हासह आमदार बंटी भागडीया यांनी आयोजित केलेल्या शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमातील सन्‍मान चिन्ह, लोकमान्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ रेशीमबागने दिलेले भारत मातेच्या छायाचित्राचे स्मृति चिन्ह, विदर्भ हिंदी साहित्य संघाचा प्रेरणा पुंज सन्मान, सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्हही रामदास पेठ येथील फुटपाथवर भंगारात पडलेले होते.

हेही वाचा >>> नागपूर: शिव्या घातल्या, मारहाण केली, हे डॉक्टर आहेत की…?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सोले यांना मिळालेले पुरस्कार भंगारच्या दुकानात असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक विजय फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाला मिळाली. आणि त्यांनी  लगेच कार्यकर्त्यांना सांगून ते सर्व पुरस्कार आणि सन्मानचिन्ह भंगार विक्रेत्याकडून परत मागवले. लोकप्रतिनिधींना सन्मानित करताना, पुरस्कार, सन्मान चिन्ह देताना संबंधित संघटनेच्या, संस्थेच्या भावना पुरस्काराशी जुळलेल्या असतात. ज्याला पुरस्कार दिला जातो त्याचे विविध क्षेत्रातील योगदानाचाही वाटा त्यात असतो. या पाश्र्वभूमीवर भाजपच्या एका माजी आमदारांकडून त्यांना मिळालेल्या सन्मान चिन्हांची भंगार विक्रेत्याकडे विक्री होणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.