लोकसत्ता  प्रशांत देशमुख

वर्धा : वर्धा मतदारसंघ महाविकास आघाडीत वादाचा ठरत आहे. तो वाद सुटावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक पाऊल मागे घेत नवा तोडगा दिला. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे आघाडीचे सर्वांत सक्षम उमेदवार ठरू शकतात, यावर एकमत आहे. म्हणून त्यांनी  काँग्रेसचा हट्ट न धरता राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना दिला. हे खरे असल्याचे सांगत काळे यांनीही याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा >>> स्मशानभूमीच्या मार्गात बांधकाम, नातेवाईकांचे तिरडीसह रस्त्यावर ठाण; अखेर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दृष्टीने पुढील पाऊल म्हणजे अमर काळे यांना शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला देण्यात आला. शरद पवार व अमर काळे हे उद्या सकाळी भेटणार. त्यातून मार्ग निघेलच, अशी खात्री दिल्या जाते. काळे यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट मनापासून तयार असून त्यासाठी बोली लागणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करतात. काळे कुटुंब काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाते. शरद काळे हे सातत्याने काँग्रेस तिकिटावर विजयी झाले होते. पुढे पुत्र अमर काळे आमदार झाले. ते आर्वी भागात कार्यरत असून प्रामाणिकपणे पक्षाचे कार्य करीत असल्याचा त्यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केल्या जातो. अखेरच्या टप्प्यात ते लोकसभा निवडणूक लढण्यास तयार झाले, तोच राष्ट्रवादी पवार गटाने हा पेच त्यांना टाकला आहे.