लोकसत्ता टीम

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी परिवारवादावर टीका करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कुठल्याही नेत्याच्या दबावाला बळी पडणार नाही, असे म्हणणाऱ्या नारायणराव गव्हाणकर यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.

अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे अकोल्यातून भाजपकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छूक होते. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा देखील समावेश होता. इच्छुकांनी तिकिट मिळवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे पूत्र अनुप धोत्रे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यामुळे इतर इच्छुकांची नाराजी झाली. नारायणराव गव्हाणकर यांनी भावनांना वाट मोकळी करून परिवारवादावरून भाजपवर टीका केली आहे. गव्हाणकर यांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. हितचिंतकांची चर्चा करून निर्णय घेईल.

आणखी वाचा-नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठल्याही नेत्याच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे गव्हाणकर यांनी स्पष्ट केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नारायणराव गव्हाणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला. अर्ज दाखल करण्यामागे गव्हाणकर यांची दबाव निर्माण करण्याची खेळी होती का? यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.