scorecardresearch

VIDEO : नागपूरमध्ये भीषण अपघात; फ्लायओव्हरवरून ८० फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील चौघे ७० ते ८० फूट उंचीवरून उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले.

VIDEO : नागपूरमध्ये भीषण अपघात; फ्लायओव्हरवरून ८० फूट खाली पडून चौघांचा मृत्यू
नागपूरमध्ये भीषण अपघात

नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात झाला आहे. कार चालकाने तीन दुचाकी स्वारांना मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लोक ८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. गणेश आढाव असे त्या कार चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा- वर्धा : गणपती विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा मृत्यू

कारचालकाची एकापाठोपाठ तीन गाड्यांना धडक

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर आरोपी कार चालकाने विरुद्ध दिशेने कार भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. कारने एकापाठोपाठ तीन गाड्यांना जबर धकड दिली. त्यात एका दुचाकीवर एक इसम त्यांचे दोन मुलं आणि त्या इसमाची आई जात होती. त्या दुचाकीला कराने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, हे चौघेही ७० ते ८० फूट पुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- नागपूर : आंघोळ करतानाची चित्रफीत काढणे पडले महागात, दोन वर्षांसाठी तरुणाची रवानगी तुरुंगात

कार चालक पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच सक्करदार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून अपघात नेमका कसा घडला यबाबत तपास सुरु केला आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून याबाबत आणखी तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four people died fall a height of 70 to 80 feet from flyover after a car hit in nagpur rno news dpj

ताज्या बातम्या