नागपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाची १ जानेवारी २०२२ ते ३१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३१ हजार २३७ प्रकरणांमध्ये १५ हजार १९१.७२ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे.

एकूण फसवणुकींमध्ये २२ हजार ४७३ प्रकरणे सायबर फसवणुकीशी संबंधित आहेत. त्यात १६३.४६ कोटी रुपयांची फसवणूक झाली. इतर संवर्गातील फसवणुकीच्या ८ हजार ७६४ प्रकरणांमध्ये १५ हजार २८.२६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचेही माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.

हेही वाचा >>> महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण

फसवणुकीमुळे वजा झालेल्या रकमेपैकी किती रक्कम वसूल केली, याबाबत स्टेट बँकेला माहिती मागण्यात आली होती. परंतु, स्टेट बँक ऑफ इंडियाचे केंद्रीय जन माहिती अधिकारी राकेश ऐमा यांनी याबाबत बँकेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर अभय कोलारकर यांना देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाईन बँकिंगमधून ८५.९२ कोटी लंपास

ऑटोमॅटिक विड्रॉल आणि डिजिटल बँकिंग खात्यातील फसवणुकीची माहिती उपलब्ध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले. ऑनलाईन बँकिंग फसवणुकीच्या ९ हजार ३८ प्रकरणात ८५.९२ कोटी, मोबाईल बँकिंग फसवणुकीच्या ३४२ प्रकरणात ४.६७ कोटी, एटीएममधील १ हजार २०८ प्रकरणात ६.०६ कोटींनी फसवणूक झाल्याची माहितीही स्टेट बँकेने दिली.