नागपूर : कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नागपूरजवळील कळमना रेल्वे स्थानकाजवळ घरसली. यामुळे नागपूर ते हावडा मार्गावरील रेल्वेगाड्या सुरक्षिततेची उपायोजना म्हणून काही मिनिटांसाठी ठिकाठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या.

हेही वाचा >>> चंद्रपूर : शेतात वीजप्रवाह सोडून चौघांनी चितळाची शिकार केली, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालागाडीचे दोन व्हॅगन (वाघिनी) रुळाखाली आल्या. त्यांना तातडीने वेगळे करण्यात आले. दरम्यान हे काम सुरू असताना इतर रेल्वे मार्ग बाधित होणार नाही. याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे नागपूर ते हावडा मार्गावरील रेल्वेगाड्यांना फारसा विलंब झाला नाही. कारण, उत्तर भारताकडून येणाऱ्या आणि तिकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या धुक्यांमुळे दहा ते १५ तास विलंबाने धावत आहेत. मालगाडी घसरल्याने कोणत्याही प्रवासी रेल्वेगाड्यांवर परिणाम झालेला नाही. केव‌ळ कोराडी वीज प्रकल्पाकडे जाणारा रेल्वे मार्ग बाधित झाला, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रविशकुमार सिंह यांनी लोकसत्ताला सांगितले.