सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या नक्षल विरोधी शीघ्रकृती दल पोलीस पथकाच्या एका जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना एटापल्लीपासून जवळच असलेल्या आलदंडी मार्गावर घडली.

गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष सिडाम असे आरोपी जवानाचे नाव असून विजय करमे असे जखमी जवानाचे नाव आहे.

नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘यमराज’ अवतरले रस्त्यावर

एटापल्ली उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या पोलीस पथकातील शीघ्रकृती दलाचे जवान आज सकाळी गस्तीवर होते. दरम्यान, संतोष आणि विजय या दोन जवानांमध्ये वाद झाला. यातून संतोषने विजयवर थेट गोळीबार केला.

चंद्रपूर : ८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरेंच्या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात विजय गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ हेलिकॉप्टरमधून नागपूर येथे नेण्यात आले. सध्या जखमी जवानाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.