सरकारी एमबीबीएस डॉक्टरसह तीन जणांना नक्षल समर्थक म्हणून पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसाची गस्त सुरू असताना नक्षल्यांचे शहीद सप्ताहाचे बॅनर लावताना हे तिघे सापडले. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा एमबीबीएस डॉक्टर पवन उईके, प्रफुल्ल् भट व अन्य एकाचा समावेश आहे. डॉक्टरसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली –

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर भागात काही अज्ञात व्यक्ती नक्षलवाद्यांना मदत करीत असल्याची माहिती पोलीस विभागाच्या हाती लागली. गुप्त पद्धतीने पोलीस विभागाचे काही कर्मचारी जंगलात लपून याचा तपास करीत होते. २८ जुलै ३ ऑगस्ट या काळात या सप्ताह असतो. गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दहशत निर्माण करण्यासाठी हे बॅनर नक्षलवादी नेहमी जंगल भागात किंवा रस्त्याच्या अलीकडे-पलीकडे लावत असतात. या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस अलर्ट राहून प्रत्येक भागात ऑपरेशन राबवत होते. हे ऑपरेशन राबवित असताना आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमलापूर नक्षलवाद्यांचे माहेरघर –

अहेरी तालुक्यातील कमलापूर हा भाग नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. डॉक्टर स्वखुशीने हे सारे करत होता की, त्याच्यावर दबाव होता? याचाही शोध पोलीस घेत आहेत.