नागपुर : गणेशोत्सव आला की, सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळे देखावे तयार केले जातात. यात विविध धार्मिक स्थळांच्या देखाव्यांची संख्या अधिक असते. नागपुरात पुरीचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीजवळ देशातील ज्वलंत प्रशाकडे लक्ष वेधणारे देखावे तयार केले जातात. सकारवर, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका करणारे देखावे पोलीस जप्त करतात. मात्र नागपुरातील धरमपेठमध्ये लागलेला फलक हा यापेक्षा वेगळा आहे. त्या फलकातून गणरायाला सरकारी अधिकाऱ्यांना सदबुद्धी दे, असे साकडे घालण्यात आले आहे.

सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची होणारी फरफट, तेथील भ्रष्टाचारामुळे नागरिकांची होणारी लुबाडणूक याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले आहे. “ हे गणराया” महापालिका, एनआयटी, आरटीओ, नगरभूमापन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर सरकारी कार्यालयातून भ्रष्टाचाराचे विघ्न दूर होऊ दे… सामान्य, गरीब नागरिकांची कामे होऊ दे … अधिकाऱ्यांना सदबुद्धी दे.. हेच तुझ्या चरणी जनतेचे मागणे’ असे या फलकावर लिहिले आहे. त्यामुळे हा फलक सध्या नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे.

beggars Nagpur, beggars luxury bus,
नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Nagpur Hit and Run, CCTV, Nagpur,
VIDEO : नागपूर ‘हिट अँड रन’चा थरार : सीसीटीव्ही फुटेज आले समोर
states all primary schools closed on September 25
राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
police chase diesel thieves and recovered stolen diesel stock
‘समृद्धी’वरील उत्तररात्रीचा थरार…काय घडले?

हे ही वाचा… राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद

फलकावर तो लावणाऱ्याचे नाव नाही, मात्र त्यातील संदेश महत्वाचा आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या प्रश्नांवर सर्वसामान्य नागपूरकरांचे लक्ष वेधणारे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहे आणि त्याची चर्चाही झाली आहे. त्याच क्रमात गणेशोत्सवाच्या दरम्यान लागलेला फलक महत्वाचा ठरतो.

आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. सत्ता कायम राहावी म्हणून सत्ताधारी पक्षाकडून लोकप्रिय घोषणा केल्या जात आहे. सरकार लोकांची किती काळजी घेते, असा अभास या माध्यमातून केला जात आहे. यापूर्वी ‘ सरकार आपल्या दारी ’ उपक्रमातून लोकांना त्यांची कामे तत्काळ केली जाणार असे सांगितले गेले होते. या उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.

हे ही वाचा…पोलिसांसोबत वनविभागही गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी रस्त्यावर

त्याची जाहिरात करण्यात आली. पण सरकारी यंत्रणा आहे तशीच आहे. आताही सर्वसामान्य नागरिकांचे कामे वेळेत होत नाही. महापालिका,एनआयटी, आरटीओ, सिटी सर्वे सार्वजनिक बांधकाम विभाग ही सरकारी कार्यालये भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध झाली आहे. कोणतेही कामे पैसे दिल्या शिवाय या कार्यालयात होत नाही. सध्या शहरात कचऱ्याचा प्रश्न ज्वलंत आहे. अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. घरा घरातून कचरा रोज उचलला जात नाही. शहरात मलेरिया, डेंंग्यू, चिकन गुनियाची साथ जोरात आहे. पण प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. ते लाडकी बहीण योजनेतच व्यस्त आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

हे ही वाचा…नागपूर : आज, उद्या पावसाचा अंदाज, अनंत चतुर्दशीला मात्र…

त्यामुळे संतापलेल्या नागपूरकरांनी त्यांच्या व्यथा या फलकाच्या माध्यमातून माडंल्या आणि थेट गणरायालाच सरकारी यंत्रणा चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना सदबुद्धी दे, अशी मागणी केली आहे.