नागपूर : लग्न ठरवण्यासाठी घरी पाहुणे आल्यामुळे भीतीपोटी मुलीने धंतोलीतील आनंद टॉकिजजवळ असलेल्या महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वर्गातच विष प्राशन करून आत्महत्या केली. रिया (काल्पनिक नाव, वय २३, मानेवाडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया ही महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. ती सोमवारी (६ मार्च) रोजी सकाळी अकरा वाजता औद्योगिक संस्थेत आली होती. तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न ठरवण्याचा विचार केला होता. परंतु, रियाला लग्न करायचे नव्हते. तिला शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती. मात्र, आईवडील तिच्या लग्नासाठी प्रयत्न करीत होते. ६ मार्चलासुद्धा मुलाकडील पाहुणे घरी आले होते. त्यामुळे रियाला आईने फोन करून घरी बोलावले होते. मात्र, रियाने घरी येण्यास नकार दिला. तिचे कुण्यातरी युवकाशी प्रेमसंबंध होते. त्या युवकाशी तिला लग्न करायचे असल्यामुळे ती लग्नाला नकार देत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – रेल्वेत तिकीट ‘कन्फर्म’ तरीही आरक्षित जागेसाठी लढा कायम; रेल्वे मंत्रालय देणार का लक्ष?

हेही वाचा – नागपूर: राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नाराजीचा सूर; प्रोत्साहन भत्त्यासाठी गृहमंत्रालयातून खोडा

६ मार्चला रियाने वर्गातच कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. अन्य विद्यार्थ्यांनी रियाला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. तिचा उपचारादरम्यान ११ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता मृत्यू झाला. धंतोलीचे हवालदार क्रिष्णा, उपनिरीक्षक शेख यांनी या प्रकरणात काहीही सांगण्यास नकार दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl committed suicide at the women industrial training institute in nagpur adk 83 ssb
First published on: 13-03-2023 at 09:38 IST