नागपूर : सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्यावर आता खाली येत असल्याची आनंददायी बातमी आहे. हे दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि पावसाळ्याच्या सुरवातीला सोमवारी (३० जून २०२५) २४ कॅरेटचे दर प्रति दहा ग्राम ९५ हजाराच्या जवळपास आले आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर आणखी खाली येणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नागपुरातील सराफा बाजारात १३ जुनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सोन्याच्या दराने २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या दिवशी नागपुरात दुपारी प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख रुपये रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७८ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार रुपये नोंदवले गेले. हे दर ३० जूनला दुपारी प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९५ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार १०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात सोन्याच्या दरात १३ जूनच्या तुलनेत ३० जूनला सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति १० ग्राम ४ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ४ हजार १०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ३ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटमध्ये २ हजार ९०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे. हे दर येत्या काळात घसरणार की वाढणार ? याकडे ग्राहकांचेलक्ष लागले आहे.

चांदीच्या दरातही घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो १३ जून २०२५ रोजी १ लाख ७ हजार १०० रुपये होते. हे दर ३० जुनला दुपारी प्रति किलो १ लाख ६ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात १३ जून २०२५ रोजीच्या तुलनेत ३० जून २०२५ रोजी ६०० रुपये प्रति किलोने घट झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती

लग्न सराईच्या दिवसात सोन्याचे वाढते दर विक्रमी उंचीवर जात असल्याने ग्राहक आवश्यकतेनुसार खूप कमी वजनाच्या दागिन्यांनाच प्राधान्य देत होते. हे दर कमी कधी होणार? हा प्रश्न सराफा व्यवसायिकांना विचारला जात होता. तर सराफा व्यवसायिक दर आणखी वाढण्याचे संकेत देत होते.