नागपूर: सोन्याचे दर करोनानंतर सातत्याने वाढत आहे. बघता- बघता आठवड्याभरापूर्वी सोन्याच्या दराने २४ कॅरेट संवर्गात प्रति दहा ग्राम जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून एक लाखाच्या दराचा विक्रमी टप्पा गाठला. परंतु सात दिवसानंतर सोन्याचे दर घसरले आहे. शुक्रवारी (२० जून २०२५) सोन्याचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.
लग्न सराईच्या दिवसात सोन्याचे वाढते दर ग्राहकांची चिंता वाढवत होते. त्यामुळे ग्राहकांकडून दागिने खरेदी दरम्यान आवश्यकतेनुसार खूप कमी वजनाच्या दागिन्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र होते. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्यावर ग्राहकांकडून हे दर कमी कधी होणार? हा प्रश्न सराफा व्यवसायिकांना विचारला जात होता. तर सराफा व्यवसायिक दर आणखी वाढण्याचे संकेत देत होते. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात १३ जूनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सोन्याच्या दराने २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. परंतु आता दर कमी झाले आहे.
नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर १३ जून २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम १ लाख रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७८ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार रुपये होते. हे दर आठवड्याभरानंतर २० जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार २०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात सोन्याच्या दरात १३ जूनच्या तुलनेत २० जून २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति १० ग्राम १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार १०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ९०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ८०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.
चांदीच्या दरात मात्र उलट स्थिती…
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो १३ जून रोजी १ लाख ७ हजार १०० रुपये होते. हे दर आठवड्याभराने २० जूनला प्रति किलो १ लाख ७ हजार ३०० रुपयेच नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात मात्र आठवड्याभरात २०० रुपये प्रति किलोने वाढ झालेली दिसत आहे.